मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना: नोव्हेंबरचा हप्ता आणि ई-केवायसी संदर्भात महत्त्वाचे अपडेट.
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या महिला भगिनींसाठी नोव्हेंबर महिन्याच्या १७ व्या हप्त्याबद्दल आणि ई-केवायसी (e-KYC) संदर्भात एक महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. अनेक महिला लाभार्थी ई-केवायसी पूर्ण न झाल्यामुळे चिंतेत होत्या.
१७ वा हप्ता: ई-केवायसीची गरज नाही!
पात्र महिला भगिनींसाठी दिलासादायक बातमी म्हणजे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा १७ वा हप्ता मिळवण्यासाठी तसेच डिसेंबर महिन्याचा १८ वा हप्ता मिळवण्यासाठी ई-केवायसी (e-KYC) करणे बंधनकारक नाही. त्यामुळे ज्या महिलांची ई-केवायसी अजूनही बाकी आहे, त्यांना नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे प्रति हप्ता ₹१५०० रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होतील.
















